सावधान ; म्यूकरमायकोसिसचा जळगाव जिल्ह्यात प्रवेश,२५ रुग्णाची नोंद,६ रुग्णाचा मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत होते.
कोरोना पाठोपाठ आता म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य जीवघेणा आजार आपले हातपाय पसरत आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या फक्त २५ रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. म्यूकरमायकोसिसची लागण झालेले बहुतांश रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयासह मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णांची अद्ययावत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार जिल्ह्यात नेमका किती प्रमाणात बळावला आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत होते. तर ४ जण पोस्ट कोविड रुग्ण होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही आता म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे,म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर्ड क्रमांक ७ मध्ये एक विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. येथे म्यूकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांची माहिती संकलन सुरू जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली. ‘जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद आहे. त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातही या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची माहिती एकत्रितपणे संकलित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक गुगल शीट तयार केली आहे.