जिल्हा बँक निवडणूक : भाजपची स्वबळाची तयारी, सर्व २१ अर्ज भरणार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन :
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या हितासाठी आपण सर्व पक्षांसोबत एकत्र येण्यासाठी अजूनही तयार आहोत. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसने महाविकास आघाडीची भाषा सुरू केल्याने भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केली, असल्याची माहिती आज आमदार गिरीश महाजन यांनी दिली. या अनुषंगाने भाजपतर्फे उद्या सर्वच्या सर्व २१ जागांवर अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आज पक्षाच्या बैठकीनंतर अजिंठा विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.
सर्व २१ जागांचे अर्ज उद्या भरून ठेवणार ; माघारीपर्यंत दिसणाऱ्या परिस्थितीनुसार निर्णय घेणार-. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन म्हणाले, सर्वपक्षीय पॅनलच्या तयारीसाठी महिनाभरापासून आतापर्यंत सर्वांसोबत ३ ते ४ बैठक झाल्या, मात्र काँग्रेसने ऐनवेळी भूमिका का बदलली हे समजले नाही. आधी तयारीसाठी चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक नेते काय करीत आहेत हे माहिती नव्हते का ? हा आमचा प्रश्न आहे. आता उद्या अर्ज भरले गेले तरी माघारीपर्यंत २० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात काही हालचाली होऊ शकतात नेमके काय होते ते पाहून पुढचे निर्णय आम्ही घेउ . अर्ज भरून ठेऊ जशी परिस्थिती दिसेल तशी निवडणूक लढवू काँग्रेस सोयीचे राजकारण करीत आहे. जिल्ह्यातील दोन्हीं खासदार आणि आमदारही उद्या अर्ज भरणार आहेत. पालकमंत्र्यांचीही भूमिका निवडणूक होऊ नये अशी होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका महत्वाची आहे व लक्षात घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीला अनुकूल दिसून आली होती , असेही ते म्हणाले.