क्राईमजळगाव

“जळगाव जिल्ह्याचे बीड होऊ नये” पोलिसही तक्रार घेईनातं, बालविकास अधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयातून सुमारे सव्वालाख किमतीचे दोन संगणक संच तत्कालीन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांच्या सांगण्यावरून सखी वन स्टॉप सेंटर, जळगाव येथील कंत्राटी कर्मचारी शुभम हिरालाल परदेशी, सुरक्षा रक्षक याने चोरी केल्याप्रकरणी तक्रार अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी पोलीस अधीक्षक, जळगाव यांना दिले आहे. चोरी प्रकरणातील आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशन टाळाटाळ करीत असल्याबाबत पत्रात नमूद आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयातील लेनोव्हो कंपनीचा एक संगणक संच शासकीय आशादीप महिला वसतीगृह, जळगाव यांना कार्यालयाच्या वापरासाठी पुरवठा करण्यात आलेला होता. सदरील संगणक संच हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयात कामकाजासाठी आवश्यकता असल्याने दि.०२.०३.२०२३ रोजी आणलेला होता. तसेच एसर या कंपनीचे ०१ संगणक संच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयातच होता. आयुक्तालयामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयासाठी नव्याने ०५ संगणक संच दि.१७.०४.२०२४ रोजी प्राप्त झालेले होते. सदरील संगणक संचावर जडसंग्रह नोंदवहीच्या नोंदीनुसार संगणकावर निर्देशांकन करणेसाठी दि.११.०३.२०२५ रोजी पेंटरला बोलाविले असता, दोन्ही संगणक कार्यालयात आढळून आले नाही.

याबाबत कार्यालयात सर्वत्र ०२ संगणकांचा तपास केला असता, सदरील संगणक संच सापडून आले नाहीत. सदरील दोनही संगणक संच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयातंर्गत कार्यरत असलेले सखी वन स्टॉप सेंटर, जळगाव येथील कंत्राटी कर्मचारी शुभम हिरालाल परदेशी, सुरक्षा रक्षक याचे चूलते विजयसिंग इंदलसिंग परदेशी हे तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या पदावर कार्यरत असल्यामुळे शुभम हिरालाल परदेशी याने त्याचे काका विजयसिंग परदेशी यांचे सांगण्यावरुन दोन्ही संगणक संच घरी चोरुन घेवून गेलेला आहे. याबाबत, पोलीस निरिक्षक, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे सदरील संगणक संच चोरुन नेलेबाबतची फिर्याद देणेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव हे स्वतः व इतर ०३ कर्मचारी गेले होते. तेथील पोलीस निरिक्षक यांनी गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगीतले.

सदर कर्मचारी तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांचा पुतण्या असुन, शुभम हिरालाल परदेशी या कंत्राटी कर्मचारी याचे भाऊ व वहिणी हे पोलिस खात्यात कार्यरत असल्याने सबंधीत पोलीस निरिक्षक, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव यांनी रफीक रुबाब तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची संगणक संच चोरुन नेले बाबतची तक्रार दाखल करुन घेतली नाही.तरी, विजयसिंग इंदलसिंग परदेशी हे तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव व शुभम हिरालाल परदेशी यांच्या बाबतीत योग्य ती दखल घेवुन संबधितांवर योग्य तो चोरीचा गुन्हा दाखल करावा. तसेच चोरांना साथ देणाऱ्या सबंधीत पोलीस निरिक्षक यांचे विरुध्द योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती व जळगाव जिल्ह्याचे बीड होवू नये असे पत्रात रफिक हुरमत रुबाब तडवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!