जळगांव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी डॉ.प्रविण मुंढे
जळगाव (प्रतिनिधी)। गेल्या बऱ्याच महिन्यापासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या बदली ची जोरदार चर्चा सुरू होती, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर गुरुवारी रात्री गृहविभागाकडून त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.
राज्याचे गृह विभागाकडुन गुरुवारी रात्री पोलीस आयुक्त, उपायुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या बदल्यां करणात आल्या असून यांमध्ये जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची बदली करण्यात आली असून त्याच्या जागी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे याची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डॉ.प्रवीण मुंढे यांची जिल्ह्यात झालेली बदली निर्णायक ठरणार असून जिल्ह्यातील विविध भागात वाढती गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कामकाजाचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. जिल्हात सध्या कोरोणाचा आपत्ती काळ असताना देखील गुन्हेगारीचा कळस हा वाढता आहे. तरुण तडफदार अधिकारी असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अधिक कल असेल असे सांगितले जाते आहे.