भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

मका खरेदी साठी केंद्र सरकारने उद्दिष्ट वाढवून दिल्याने खा. रक्षा खडसेनी मानले रावसाहेब दानवेचे आभार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (विशेष प्रतिनिधी)। केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित शासकीय मका खरेदी केंद्र सुरु होती. परंतु केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे दि.१८/१२/२०२० रोजी आदेश काढण्यात आले.

मुदतीआधीच उद्दिष्ट पूर्ण होत असल्याने मका खरेदी थांबली.
मुळात मक्याची जवळपास महिनाभराने उशीरा सुरु केलेली खरेदी, लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणी, पोर्टल-सर्व्हर डाउनने खरेदी केंद्रांकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. अनेक शेतकरी खरेदी केंद्रे पुन्हा सुरु होण्याची वाट बघताहेत. काही शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्रांवर तर काहींचा घरात भिजत आहे. खुल्या बाजारात विक्री करावी तर हमीभावाच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये फटका बसत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या व्यवस्थापनाबरोबर घरखर्चासाठी पैसा हवा आहे. धान्योत्पादनाबरोबर चारा तसेच पशू-पक्षी खाद्यात मक्याचा उपयोग होतो. मक्याचा उत्पादन खर्चही वाढलेला आहे. अशावेळी किमान हमीभावाचा आधार मिळावा, अशी मका उत्पादकांची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्दिष्ट, मुदतवाढ, प्रस्ताव यांत केंद्र-राज्य सरकारने न अडकता मका खरेदी सुरु ठेवायला हवी अशी मका उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे मागणी केलेली होती.

खासदार रक्षा खडसे यांचा मका खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला-

राज्य सरकारने गरज भासल्यास आणि तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना दिलेले होते. त्याअनुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी सुरू करण्यासाठी उद्दिष्ट वाढवून दिल्याबाबतचे पत्र आज राज्य सरकारला प्राप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!