मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू, त्या भीतीने गिरीश भाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झाला नाही ? एकनाथ खडसेचा प्रश्न…
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : गिरीश भाऊंवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानेच तर त्यांना कोरोना झाला नाही ना? असा संशय असल्याचे म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनावर हल्लाबोल करत सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला होता त्यावेळी महाजनांनी खडसेवर केलेल्या टीकेचा समाचार खडसेंनी यामाध्यमातून घेतला आहे.
भाजप आमदार गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, यावरून महजनांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या भीतीने तर महाजनांनाा कोरोना झाला नाही ना? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
गिरीश महाजनावर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली नाही ना ? अशी शंका मला असल्याचे म्हणत असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे, तसेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले राहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला, त्यावेळी काही सवाल उपस्थित करत टीका केली होती, एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते, तेव्हाच कोरोना होतो, असे महाजन म्हणाले होते. त्या टीकेचा समाचार खडसेंनी आता घेतला आहे. माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. गिरीश महाजन मागे ईडीच्या चौकशा लागल्याने नाथाभाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झाला असे ते म्हणाले होते. मला तर खरोखर कोरोना झाला होता. आताही गिरीश भाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे. मला वाटते त्यांच्यामागे मोक्का लावण्याची कारवाई सुरु दिसते, त्या भीतीपोटी त्यांना कोरोना झाल्याचा मला संशय आहे, असे खडसे म्हणाले.