जिल्हा बँक निवडणुक : एकनाथराव खडसेचा उमेदवारी अर्ज दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून यासाठी आज जिल्हा बँकेच्या परिसरात गर्दी उसळली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे ते बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. या अनुषंगाने आज त्यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे.
आज निवडणूक निर्णय अधिकार्याकडे खडसे यांच्या वतीने वसंतराव भिकाजी पाटील यांनी यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला आहे. या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून वसंतराव भिकाजी पाटील यांची तर अनुमोदक म्हणून चंद्रकांत विनायक बढे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा असणार?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दि. ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात होणार असून दि. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दि. २० रोजी छाननी होणार आहे. दि. २१ पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. त्यानंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असून दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.