जळगावात वृद्धांची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी)। येथील शिव कॉलनी परिसरात राहत्या घरात गळफास घेऊन ६३ वर्षीय वयोवृद्धने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरात कोणीही नसताना पंख्याला दोर बांधून पद्माकर सुकलाल सूर्यवंशी (वय ६३, परिजात अपार्टमेंट शिव कॉलनी) गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घडला त्यावेळी सून ही माहेरी गेली होती तर मुलगा सुहास सूर्यवंशी हा रेल्वेत नोकरीवर असल्याने कामावर गेला होता. सायंकाळी ५.३० वाजता मुलगा सुहास ड्यूटीवरुन घरी आला. त्यावेळेस वडील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच शेजारच्यांना मृतदेह खाली उतरून शिरसोली रोडवरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. रामानंदनगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.