भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बनावट दारू प्रकरण;निरीक्षक वाघ सह चौघे निलंबित,दारू विक्रेत्यामध्ये खडबड

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)| गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळ येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले हा बनवत कारखाना सुरू असतांनाही स्थानिक सम्बधित अधिकार्‍यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत कोणतीही कारवाई केली नाही म्हणून स्थानिक राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या चौघा आधीर्‍यांना निलंबीत करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवर एका फर्निचरच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकून तेथे सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता.या ठिकाणी बनावट दारू तयार होत होती, भुसावळात हा बनावट कारखाना सुरू असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील पथकाला कारवी लागल्याने स्थानिक भुसावळातील उत्पादन शुल्क अधिकारी काय करत होते ? असा प्रश्‍न उपस्थित होऊन उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले .या प्रकाराची राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे गंभीर दखल घेण्यात येऊन उतपादन शुल्क विभागाचे भुसावळ येथील निरिक्षक आय.एन. वाघ यांच्यासह के.बी. मुळे; एस.एस. निकम व एम.बी. पवार या चार कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सचिव कांतीलाल उमप यांनी आदेश जारी केले . राज्य उत्पादन शुल्क खात्यात आर्थिक हितसंबंध जोपासत हप्तेखोरी सारखे गैरव्यवहार हे या पूर्वी देखील आरोप झाले मात्र आर्थिक व्यवहाराद्वारे ते दडपण्यात आले, एकाच वेळी निरिक्षकासह चौघांना निलंबीत करण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागासह दारू दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!