उपमहापौर गोळीबार प्रकरणी दोन जणांना जामनेरातून अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, प्रतिनिधी: जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर चार जणांकडून काल रात्री गोळीबार करण्यात आला होता त्यापैकी दोन संशयितांना आज दुपारी रामानंदनगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे.
जामनेर तालुक्यातुन दोन संशयितांना अटक- काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चारही संशयितांच्या तपासासाठी चक्रे फिरवली होती. यातील पिंप्राळा जळगाव येथील रहिवासी दोन संशयित आरोपी उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत यांना रामानंद नगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे. दोघांना रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत दोघांची कसून चौकशी सुरू आहे. तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत. पोलीस नाईक प्रविण जगदाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, रवी पाटील, शिवाजी धुमाळ, संदीप महाजन, पोहेकॉ संजय सपकाळे, पो.कॉ. उमेश पवार, गिते यांनी कारवाई करत इतरांना अटक केली आहे.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या चार जणांकडून गोळीबार करत घटनास्थलावरुन पसार झाले होते. यात सुदैवाने उपमहापौर बचावले होते. मात्र, यामुळे प्रचंड शहरात खळबळ उडाली आहे. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार रात्री उशीरा कुलभूषण वीरभान पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार महेंद्र राजपुत, उमेश राजपुत, मंगल राजपुत आणि बिर्हाडे ( पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द या अनुषंगाने भादंवि कलम-३०७, ३४१, ५०४, ५०६, ५०७ तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.