कारागृहातून कैदी पसार झाल्याने अधिक्षकांसह चार जणांचे निलंबन !
जळगाव (प्रतिनिधी) । जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैदी फरार झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणाची वरिष्ठांकडुन गंभीर दखल घेण्यात आली असून तत्कालीन अधिक्षक व तुरूंगाधिकार्यांसह चौघांना निलंबीत करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, जिल्हा कारागृहातून अगदी दिवसाढवळ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लाऊन तीन कैदी सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) फरार झाल्याची घटना मागील आठवड्यात घडला होती. घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरण संवेदनशील असल्याने याची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. फरार झालेल्या तिन्ही गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. नवे अधिक्षक म्हणून उस्मानाबाद येथील गजानन पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे परंतूं आता त्यांच्या जागी पेट्रेस जोसेफ गायकवाड यांची कारागृह अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आधीचे तुरूंगाचे असणारे अधिक्षक राजेंद्र मरळे, तुरूंग अधिकारी बी.एम. तडवी, रक्षक संजय पाटील आणि प्रकाश मालचे या चौघांना निलंबीत करण्यात आले आहे.