चार वर्षीय चिमुकलीवर नराधमाने केला अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। नशिराबाद पोलिसस्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, नशिराबाद पोलिसस्टेशन हद्दीतील एका गावात कुटुंबासह राहात असलेली चार वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासह राहात होती. दुपारच्या वेळेला चिमुकली घरी एकटी असतांना संशयित आरोपी परमानंद कन्हैय्या गोरे रा. गुलई. जि. खंडवा,मध्यप्रदेश,ह.मु. जि. जळगाव याने खेळण्याच्या बहाण्याने बोलवून एकांतात तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी परमानंद कन्हैय्या गोरे यांच्यावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.