भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

भाजप सोडणाऱ्या नगरसेवकाना अपात्रतेपासून मंत्रीच काय,देवही वाचवू शकत नाही : गिरीश महाजन

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। भारतीय जनता पक्षातून फुटून शिवसेनेत जळगाव महापालिकेचे नगरसेवक गेले आहेत. या नगरसेवकांना अपात्रतेपासुन मंत्री नव्हे, देवही वाचवू शकणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, आम्ही आता कोणालाही थांबविणार नाही, जे जातील आणि गेले आहेत ते नगरसेवक अपात्र ठरतील, आम्ही आता त्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेत आहोत. या नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही करणार आहोत, या नगरसेवकांना वाटत असेल की मंत्री आपणास वाचवतील. परंतु त्यांना या कारवाई पासून आता मंत्रीच काय देवही वाचवू शकणार नाही. ते अपात्र होतीलच आणि ते पुढची निवडणूकही लढवू शकणार नाही. पक्षातर्फे या बाबतीत आता अत्यंत खंबीर पाऊले उचलण्यात येत आहेत, अपत्रातेची ही केस सर्व तांत्रिक आंगाने पक्की करण्यात येत आहे, लवकरच या नगरसेवकांना नोटीस येईल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात फुटून शिवसेनेत गेले आहेत, अजूनही काही नगरसेवक जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपकडून ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी नगरसेवकाची बैठक घेऊन चर्चा केली होती, मात्र तरीही काही नगरसेवक जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!