भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यात आज फक्त ७ रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोविडची रूग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असतांना गेल्या चोवीस तासात रुग्ण संख्या फक्त ७ आढळून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त ७ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यात अमळनेरातील ३; चोपडातील ४ पेशंटचा समावेश आहे तर उर्वरित तालुक्यांमध्ये एकही पेशंट आढळून आलेला नाही. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्येच जिल्ह्यातील ८४ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात २५६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे कोरोनाची लाट ओसरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!