भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

मोठा दिलासा-जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवाला नुसार आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही.

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर आज दिवसभरात १४ कोरोना बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५१ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजपर्यंत २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६८ कोरोना बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसध्दिीपत्रकान्वये दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!