‘ इतक्या ‘ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असल्यास भरण्यासाठी धनादेश द्यावा लागणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। विजेचे बिल आता रोखीने भरता येणार नाही. ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असल्यास ते भरण्यासाठी धनादेश द्यावा लागणार आहे. वीज नियामक आयोगाने हा निर्णय दिला असून सर्व विभागांना याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले आहेत.
ऑनलाइन सेवेला चालना मिळावी, यासह गैरमार्गाने कमावलेला पैसा थकीत वीज बिलाच्या स्वरूपात भरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करून याची नोंद राहावी. यासह राेखीने जास्तीचे बिल भरणा करणारे कोण आहेत? हे कळावे यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २४ फेब्रुवारी रोजी वीज बिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा ५ हजार रुपये केली. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जारी केले होते. मात्र, महावितरणकडून त्याची प्रत्यक्ष कृती ७ ऑक्टोबरला सुरू झाली. त्यामुळे आता ग्राहक ५ हजार रुपयांच्या वर रोखीने वीज बिल भरू शकणार नाहीत. तसेच महावितरणकडूनही ते स्वीकारले जाणार नाही. पाच हजार रुपयांवरील वीजबिल भरणा करण्यासाठी ऑनलाइन सेवा, डीडी आणि चेकचा वापर करावा लागेल. हा निर्णय ग्राहकांबरोबरच महावितरणच्या वसुली पथक, अकाउंट खात्यासाठी डोकेदुखी ठरणार हे स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन सेवेचा पर्याय
महाविरतणने ग्राहकांसाठीwww.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पद्धतीने विनामार्यादा वीज देयकांचा भरणा करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. वसुली पथकाला त्यावरील रक्कम स्वीकारता येणार नाही. ऑनलाइनच्या गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग, डीडी, चेकच्या माध्यमाचा वापर अनिवार्य झाला असल्याचे महाविरतणकडून सांगण्यात आले आहे.