जळगाव जिल्ह्यात आजही २७० कोरोना बाधित रुग्ण, भुसावल सर्वाधिक
मंडे टू मंडे वृत्तसेवा।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीचं आहे. आज पुन्हा जिल्ह्यात २७० नवे बाधित आढळून आले आहे. तर १४ बरे होऊन घरी गेले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२६४ इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार १६२ गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रुग्ण बरे देखील झाले आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २७० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ६६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १३७, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव ३, यावल २, रावेर ४ ,एरंडोल ३, जामनेर २, पारोळा १, चाळीसगाव १३, मुक्ताईनगर १४, आणि इतर जिल्ह्यातील ४ असे आढळून आले.