भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आजही ४७ कोरोना बाधित रुग्ण,जिल्ह्यात आजवर एकुण १,४२,०२९ बाधित रूग्ण

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाची कमी झालेली रूग्णसंख्या ही आज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ४७ कोरोना बाधीत आढळून आले असून १४१ जण बरे झाले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील रूग्णसंख्या ही पन्नासच्या आत येत असल्याचे दिसून आले. गेल्या चोवीस तासांमधील रूग्णसंख्येतही हाच ट्रेंड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात जिल्ह्यात ४७ कोरोना बाधीत आढळून आले असून याच कालावधीत १४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक दिवसात एका कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-३, अमळनेर-२, चोपडा-४, पाचोरा-४, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, जामनेर-४, रावेर-४, पारोळा-५, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४७ रूग्ण आढळून आले आहे.

आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४२ हजार ०२९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार २४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार २१७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!