जळगाव जिल्हा आज कोरोना मुक्त,एकही रुग्ण नाही
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लाट दिवसेंदिवस ओसरतांना दिसून येत असतांनाच गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेला नाही.
गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. काल केवळ एक रुग्ण आढळून आला होता. आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. तर गेल्या २४ तासांमध्ये आठ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आता फक्त ७ सक्रीय कोरोना रूग्ण असून यातील ६ पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती जिल्हा कोविड प्रशासनाने दिली आहे.