भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जळगाव जिल्हा बँक निवडणुक;गिरीश महाजन व एकनाथराव खडसे याचे मनोमिलन ? गुलाबरावांची शिष्टाई सफल होणार?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा वाद सर्वश्रुत
असताना मात्र जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील मध्यस्थी करणार असल्याचे वृत्त असून त्यांची शिष्टाई सफल होणार काय? व याना एकत्र आणल्या नंतर जिल्हा बँकेचे निवडणूक बिनविरोध होणार का ? याकडेच आता जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू असून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघडी म्हणून एकत्र आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष सोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते.आता ते राष्ट्रवादीत आहेत.भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पक्षाकडून तेच जळगाव जिल्ह्यात निर्णय घेतील. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन यांचीही सहमती असणे आवश्यक आहे.असे असताना जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली असून
काँग्रेस पक्षाने वेगळा घरोबा करत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची ही खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने काँग्रेसच्या या भूमिकेमुळं सर्व पक्षीय आघाडीच्या प्रयत्नांना खीळ बसणार का? की मनोमिलन होऊन निवडणूक बिनविरोध होणार? हे वेळीच कळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!