जळगाव हादरले: माजी महापौराच्या मुलाची निर्घृण हत्या
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिवाजीनगर भागात रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे यांचा रात्री 11:30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजु उर्फ बाबू याचा गुरुवारी वाढदिवस होता. बँनर व फटाके आनुन भावाचा वाढदिवस जोरदार साजरा करु असी तयारी आटपून राकेश अशोक सपकाळे, लहान भाऊ सोनु अशोक सपकाळे व गाडी चालक सलमान हे तिघेही रात्री 11 वाजता हॉटेल अशोका पॅलेस येथून घरी शिवाजीनगर येथे निघाले होते. शिवाजीनगरच्या स्मशानभूमीजवळ आल्यावर अज्ञात संशयित लाडू गँगच्या लोकांनी हल्ला चढविला. त्यावेळी राकेश याच्यावर मागून पुढून जबरदस्त वार झाल्यामुळे . त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोनू सपकाळे याच्या हातावर वार होऊन जखमी झाला व चालक सलमान याने पण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोनू सपकाळे यांची सोन्याची अंगठी व चेन घटनास्थळा वरुन गायब झाली असल्याची माहिती कळाली तसेच याप्रकरणी शहर पोलिस स्थानकाचे कर्मचारी यांनी 2 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण कुमार मुंढे, उप पोलीस अधिक्षक कुमार चिंथा,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली