जळगाव पुन्हा हादरले; धारदार शस्त्रांनी वार करून तरुणांचा खून !
जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील खून, गंभीर हल्ल्यांचे सत्र थांबतच नसून गेल्या काही दिवसात दुसरा खून झाल्याचा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. इंद्रप्रस्थ नगर परिसरात एका तरुणाची धारधार सहस्त्राने वार करून खून करण्यात आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, येथिल शिवाजीनगर भागातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळ जवळ भूषण भरत सोनवणे (वय २५) रा. इंद्रप्रस्थ नगर परिसरातील हरिओम शांती नगर) या तरुणांचा रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून तसेच दगडाने मारून खून केल्याचे उघडकीस आल्याने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील खून, गंभीर हल्ल्यांचे सत्र थांबतच नसून गेल्या काही दिवसात दुसरा खून झाल्याची घटना घडली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा लागलीच घटनास्थळी दाखल झाले आहे आणि संशयित तीन जणांना ताब्यात घेतल्याचे समजत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.