भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

बिग ब्रेकिंग | भाजपचे खासदार उन्मेष पाटलांसह पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार ? मातोश्री कडे रवाना

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला असतांना उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून शिवसेना ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटील मातोश्री कडे रवाना झाले आहे.

भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच उन्मेष पाटील नाराज झाले. उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटील मातोश्री कडे रवाना झाले आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची सामना कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहेत. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. याशिवाय जिल्ह्यातील भाजपचे बडे पदाधिकारी देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!