रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या मागणी करिता लक्षवेधी खड्डे पूजन आंदोलन….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव जामोद जि. बुलढाणा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जामोद तालुक्यातील pwd, pmgsy, cmgsy तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येत असलेले काही रस्ते त्यामध्ये प्रामुख्याने मडाखेड खुर्द ते इलोरा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे माहेरघर म्हणून बनलेला आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरता ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन सुद्धा दिली. परंतु अद्याप पर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
तसेच कुरणगाड बु.या गावाला जाणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर सिंगल कोड टाकण्यात आला होता. डबल डांबरीकरणाचा कोड टाकण्यास विलंब केल्यामुळे कालावधी उलटून गेल्यावर या रस्त्याला पुन्हा खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे ही खड्डे बुजवण्यात यावी व डांबरीकरण ना सुरुवात करण्यात यावी याकरिता १५ डिसेंबरला निवेदन सुद्धा देण्यात आले होते.परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
त्यानंतर ग्राम सातळी येथे जाणार्या मुख्य रस्त्याचे प्रकरण निकाली काढावे याकरता ग्रामस्थांच्या वतीने दहा ते पंधरा निवेदने, तीन उपोषणे करण्यात आली परंतु या रस्त्याचा प्रश्न सुद्धा जैसे थे असल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे गोळेगाव (नवीन) या गावचा रस्ता हा सुद्धा खड्ड्यांचा माहेरघर म्हणून बनलेला आहे या रस्त्याने ग्रामस्थांना दळणवळण करत असताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे हा रस्ता दुरुस्त होणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.
तसेच भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून टाकळी खासा रस्त्याचे काम जैसे थे दिसून येते पावसाळ्याच्या मधल्या काळात या रस्त्याने ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना , शेतकरी बांधवांना दळणवळण करत असताना रस्त्याला असलेला चिखल याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला होता या रस्त्यावर खडीकरण करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावी या मागणी करता ग्रामस्थांच्या वतीने युवा आंदोलक अक्षय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय जळगाव जामोद,जिल्हा बुलढाणा.या कार्यालया समोर भर पावसात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.असे असून सुद्धा या रस्त्याचा प्रस्ताव अद्याप पर्यंत शासन स्तरावर पोहोचलेला नाही.
तरी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने तालुक्यातील वरील सर्व रस्त्यांची प्रश्न विचारात न घेतल्याने ह्या रस्त्याचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावे याकरिता युवा आंदोलन अक्षयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आज दिनांक २२ मार्चला जिल्हा परिषदेच्या गोळेगाव फाटा या रस्त्यावर तर पीडब्ल्यूडी च्या कुरणगाड फाट्यावर पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करून शासनाला जागे करण्याकरता खड्डे पूजन आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान गावातील व परिसरातील लोकांनी पाठिंबा दर्शवत प्रशासकीय यंत्रणा व शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी अक्षय भाऊ पाटील, वैभव जाणे, आकाश आटोळे, पंजाबराव पाटील, पप्पु पाटील, शुभम रोटे, गणेश परीहार, गजानन पाटील, बाळु घुळे, सदाशिव जाणे, विश्वभंर पाटील, सुरेश पुरी, सोपान भालतडक, दत्ता पाटील तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा