भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित…शेतकर्‍यांकडून शासनाला गाजर भेट …..!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव जामोद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सप्टेंबर_आक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली होती.
त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले ज्वारी, मका, बाजरी, उडिद, मुंग , सोयाबीन आदी काही पिके जमीनदोस्त झालेली होती.

नदिकाच्या व पाण्याच्या प्रवाहात असलेल्या जमिनी ह्या पिकांसह खरडुंन गेलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याकरीत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाचे पंचनामे सुद्धा करण्यात आले होते. सरकारचे लक्ष वेधावे या करीता शेतकर्‍यांच्या वतीने निवेदने सुद्धा देण्यात आली होती. परंतु ६-७ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत कोणत्याच प्रकारची मदत जमा झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आर्थिक मदत न करता शासन केवळ शेतकऱ्यांना गाजर देण्याचे काम करते का.? असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेला आहे.त्यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्यामार्फत शासनाला गाजरं पाठवुन देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!