भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जिल्हा बँक निवडणूकीचे सर्वपक्षीय पॅनल : फॉर्मुला ठरला !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय पॅनलच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला असून याबाबत उद्या अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रशासनासह सर्व पक्षीयांकडूनही तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्वपक्षीय पॅनलसाठीच्या घडामोडींनाही वेग आला असून यासंदर्भात नुकतीच गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यानंतर शनिवार दि.९ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. राजूमामा भोळे, माजी आ. गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी नेत्यांची उपस्थिती होती.

असा आहे फॉर्मुला?
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक सुरू असतांनाच आगामी निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा तर शिवसेनेला पाच आणि कॉंग्रेसला दोन जागा देण्यावर एकमत माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, याफॉर्म्युल्याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन याबाबत उद्या अधिकृत घोषणा करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!