आयपीएल क्रिकेटच्या सट्ट्यावर एलसीबीची धाड,दोघे ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी)। शहरात आयपीएल क्रिकेटचा सामना सुरू असतांना ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या दोन जणांना शिवकॉलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत अटक केली आहे.
याबाबत अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिव कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर योगेश प्रदीप महाजन (वय २६) रा.गंगासागर अपार्टमेंट, शिव कॉलनी याच्या घरात केकेआर विरुध्द सीएसके या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गंगासागर इमारतीला परिसरात सापडा रचून सट्टा घेत असल्याची खात्री पटताच पथकाने धाड टाकून योगेश महाजन व राजेंद्र श्रीराम पाटील (वय ३९) रा.गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा या दोघे जणांना रंगेहाथ पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राईव्ह, लॅपटाप व १० मोबाईलसह १ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.