अल्पवयीन मुलीस तोंड दाबुन ओढत नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमास अखेर अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता गल्लीतीलच संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला होता. मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परन्तु तेव्हापासून योगेश हा फरार होता.धरणगाव पोलिसांचे एक पथक तेव्हापासून आरोपी योगेशचा शोध घेत होते. त्यानुसार आज जळगाव तालुक्यातील सावखेडा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.