उकळते गरम पाणी टाकले पत्नीच्या अंगावर; गुन्हा दाखल !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दुध फेडरेशन परिसरालगत असलेल्या राजमालतीनगरात घरात स्वयंपाकाची तयारी करत असलेल्या पत्नीच्या अंगावर अंघोळीसाठी गरम केलेले पाणी पतीने पत्नीच्या अंगावर ओतले. यात महिला भाजल्याने अंगाची आग होत असल्याने जखमी अवस्थेत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार राजमालतीनगरात फरजानाबी या पती जाबीर शेख, मुल अश्पाक व शोएब यांच्यासमवेत वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात; तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. आज रविवार (ता.१४) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पती आणि मुलांसाठी नास्ता व स्वयंपाकाची तयारी सुरू होती. या दरम्यान फरजाना या कणीक मळत होत्या. त्याच वेळी पती जाबीर शेख हे अंघोळीला जात असताना बाथरुममध्ये हिटर लावुन गरम करण्यात आलेल्या पाण्याची बादली घेवून शेख आले. बादलीतील उकळते पाणी फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. अचानक अंगावर उकळते पाणी पडल्याने किंचाळ्या मारतच फरजाना घराबाहेर धावत सुटल्या. दोघा मुलांनी आईच्या मागे धावत गेल्यावर जाबीर यांनी मुलांना मारहाण केली. यानंतर जावई गुलाब शेख व दोघा मुलांनी फरजाना यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्या जबाबावरुन पती जाबीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.