भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

शिवसेना व खडसेंकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, जळगाव महापालिकेत सत्तांतर; महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला व विशेषतः माजी मंत्री गिरीश महाजन यांना जबर धक्का बसला असून सत्तापरिवर्तन करण्यात शिवसेनेला यश आलं आहे. जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून महापौरपदी जयश्री महाजन यांची निवड झाली. भाजपला हा जोरदार धक्का मानला जात आहे.

महापालिकेत अनेक वर्षानंतर भाजपने सत्‍तांतर घडविल्‍यानंतर ते टिकविता आले नाही. एकहाती सत्‍ता मिळविणाऱ्या भाजपचेच नगरसेवक फुटल्‍यानंतर अवघ्‍या अडीच वर्षानंतर पुन्हा सत्‍तांतर घडले. भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने महापालिकेची सत्‍ता काबिज करत भगवा फडकाविला. महापालिकेच्‍या महापौर निवडीच्‍या अनुषंगाने चार दिवसांपासून महापालिकेत राजकिय उलथापालथ झाल्‍या. शिवसेनेची पुरेशी सदस्‍य संख्या नसताना भाजप मधील खडसेंना मानणारा वर्ग नाराजीचा सूर लावत भाजपचे फुटलेले २७ आणि एमआयएमचे तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकविला. यात महापौर पदी जयश्री महाजन यांची निवड झाली.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत एक वर्षात कायापालट करणार असे आश्‍वासन देत भाजपने एकहाती सत्‍ता मिळविली होती. मात्र या दरम्‍यान भाजपच्याच नगरसेवकांमध्ये फुट पडली. आता महापौर पदासाठीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्‍याने नव्याने महापौर निवड लागली. या निवड प्रक्रियेत भाजपची कसोटी पणाला लागली. या निवड प्रक्रियेत चित्र पालटले आणि भाजपमधील नाराज नगरसेवकांचा गट फुटला आणि शिवसेनेला जावून मिळाला. यामुळे शिवसेनेला सत्‍ता स्‍थापन करणे सहज शक्‍य झाले. ऑनलाइन मतदान प्रक्रियेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना ४५ तर प्रतिभा कापसे यांना ३० मते पडली. यामुळे श्रीमती महाजन या विजयी झाल्‍याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. तर उपमहापौर म्‍हणून कुलभूषण पाटील विजयी झाल्‍याचे जाहीर केले.

खडसेंची भूमिका ठरली महत्वाची– भाजपची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी खडसेंची भूमिका ही ठरली महत्वाची मुख्यमंत्री व खडसे यांची जळगाव मधील विकास कामांवर चर्चा झाली त्यात महापौर निवडणुकीत सतांतर होऊ शकते असे खात्री पटल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राऊत व खडसे , जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूत्र फिरवली त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणारे आणि भाजपचे निष्ठावंत सुनील वामनराव खडके यांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याचासाठी त्यांच्या तंबूत जाण्याचा निर्णर्य घेतला अर्थात हा निर्णय घेण्यापूर्वी खडके यांनी इतरांना खडसेंच्या भेटीस नेत सतांतरच्या प्रक्रियेला बळ दिले गेले

महापौर पदासाठी शिवसेनेकडून जयश्री सुनील महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज होते. तसेच भाजपकडून महापौरपदासाठी भारती सोनवणे आणि प्रतिभा कापसे आणि उपमहापौर पदासाठी मयुर कापसे आणि सुरेश सोनवणे यांचे अर्ज भरले आहेत. अकराला माघारीची वेळ देण्यात आली होती. यात भाजपच्या माजी महापौर भारती सोनवणे आणि मयुर कापसे यांनी माघार घेतली. महापौर पदासाठी झालेल्‍या निवडणुकीत जयश्री महाजन या विजयी झाल्‍याने त्‍यांना महापौर म्‍हणून घोषीत करण्यात आले. तर उपमहापौर म्‍हणून कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!