पाच मिनिटात येतो असे आईला सांगत मुलाने कायमचा निरोप घेतला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। आई मी पाच मिनटात घरी जावून येतो असे सांगत भुषण हॉटेलवरुन घरी आला. आजी- आजोबा बँकेत गेल्याने घरात कोणीच नसताना त्याने गळफास घेऊन अखेरचाच जगाचा निरोप घेतला.
जळगाव शहरातील ब्रुकबॉन्ड कॉलनीतील रहिवासी १३ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवुन आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी घडली. भुषण कैलास भोई (वय १३) असे मयत तरुणाचे नाव असून तो, विद्युत कॉलनीतील शंकुतला विद्यालयात शिक्षण घेत हेाता. मूळ रहिवाशी नशिराबाद येथील असलेले कैलास रतन भोई यांचे राष्ट्रीय महामार्गालगत चहा नाश्त्यांचे हॉटेल आहे. हॉटेल व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणासाठी भोई कुटूंबीय जळगावात स्थायीक होत ब्रुकबॉन्ड कॉलनीत भाड्याचे घर घेवून राहतात. पत्नी दोन मुले व सासू सासरे असा परिवार राहतो. कैलास भोई आज कामानिमित्त नशिराबाद गेले होते. तर, त्यांचे सासरे भिमराव भोई व सासू लक्ष्मणाबाई बँकेत गेले होते. पत्नी रत्नाबाई व मुलगा भूषण असे देाघे हॉटेल सांभाळत होते.
मी पाच मिनटात घरी जावून येतो असे आईला सांगत भुषण हॉटेलवरुन घरी आला. आजी- आजोबा बँकेत गेल्याने घरात कोणीच नसताना त्याने गळफास घेतला. थोड्याच वेळात आजी लक्ष्मणाबाई व आजोबा भिमराव भोई घरी परतले. दार ठोकूनही आतून कोणीच उघडत नसल्याने त्यांनी दुकानवार येत घडला प्रकार भुषणची आई रत्नाबाई हिला सांगितला. भुषण झोपून गेला असेल किंवा खोड्या करत असले म्हणून रत्नाबाई घरी आल्या. बराच वेळ दार ठोकून पाहिले; मात्र दार उघडेना म्हणून खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न केला. दार उघडताच त्यांना मुलगा भूषण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाला बघताच रत्नाबाईंनी हंबरडा फोडला. साधारण चार वर्षापुर्वी कैलास भोई उल्लासनगरला होते. गावशीव जवळ उद्योगाच्या उद्देशाने ते परतले. महामार्गालतच त्यांनी नाश्ताचे हॉटेल सुरु केले.
पती-पत्नी देाघे हॉटेल सांभाळून कुटूंबाचे उदनिर्वाह करतात. सासरे भिमराव भोई व सासू लक्ष्मणाबाई मुलीच्या हट्टामुळे तिच्याकडे आले होते. कैलास भोई यांना दोन मुले भूषण व विशाल शंकुतला विद्यालयात शिक्षण घेतात. विशाल हा पाचवीत शिकतो. तर भूषण हा सातवीच्या वर्गात होता. भुषणचा मृतदेह बघताच आईसह त्याच्या वडीलांना प्रचंड आक्रोश केला. मानसिक धक्का बसल्याने दोघे निशब्द झाले .