जळगावराजकीय

जळगांव पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट हॅक

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडी सरकारचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट कुणीतरी हॅक करण्यात आले असून त्यांच्या ट्विटवर अकाउंटवरील प्रोफाइल फोटोच्या एवजी कुणातरी दुस-याचा फोटो दिसत आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नेहमीच त्यांच्या ट्विटर वरुन जनतेच्या संपर्कात असतात. त्यांचे ट्विटर खाते कुणीतरी हॅक करण्यात आले असून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. यात विशेष म्हणजे त्यांच्या अकाऊंटची आधी सर्वांसाठी खुली असणारी टाईमलाईन ही प्रोटेक्टेड करण्यात आली असून एकंदरीत खाते लॉक झाल्याचे देखील दिसत आहे.तर अकाउंटवरील ना. पाटील यांच्या प्रोफाइल फोटोच्या एवजी कुणातरी दुस-याचा फोटो दिसत असल्याने सावधगिरी म्हणून याप्रकरणी जळगाव सायबर शाखेत रमण मोहन अढळकर यांनी याबाबत फिर्याद नोंदविली असून सायबर खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!