भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात भोंगळ कारभारा बद्दल आ.भोळेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी तक्रार करत जिल्ह्याधिकार्‍यांकडे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मोजमाप, मिळकत दाखला व इतर शासकीय कामांमध्ये टाळाटाळ करीत असून, नागरिकांची फिरवाफिरव करीत असल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कर्मचार्‍यांकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे. नागरिकांच्या कामासाठी व दाखले देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते तसेच या कार्यालयातील कर्मचारी हे वारंवार गैरहजर राहत असून बाहेरगावावरून येणार्‍या नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना सतत ये-जा करावी लागत असून किरकोळ कामासाठी खोळंबून ठेवत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने दोन वेळेस या कार्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना याबाबत सूचनाही स्वत: दिल्या मात्र, या कार्यालयात नागरिकांची फिरवाफिरव सुरूच असून नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे आमदार भोळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!