भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमुक्ताईनगर

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्या भरा पासून मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असुन त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केली आहे.

यावेळी हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश भाऊ माळी, गटनेते कैलास भाऊ चौधरी, नगरसेवक दिपक भाऊ झांबड, गोपाळ भाऊ गंगतिरे,रवींद्र भाऊ खेवलकर,प्रदिप बडगुजर,भरत अप्पा पाटील,मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील,शंकर चिखलकर, हमीदपठाण, महेश शेळके उपस्थित होते जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत उडीद मुग ,सोयाबीन ला कोंब फुटले आहेत तर कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहेत यात शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी महोदय यांनी महसुल यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!