जळगावात पुन्हा खून : डोकं ठेचून वृद्धांची निघृण हत्येने खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव पुन्हा एका खुनाने हादरले असून काल सख्या मुलांनीच बापाचा खून केला होता त्यानंतर आज एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोकं ठेचून हत्त्या करण्यात आल्याची घटना आज सोमवारी घडलीय. जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन नजीक ही घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राजू पंडित सोनवणे वय-५५ असे मृताचे नाव आहे. राजू सोनवणे हे आपल्या पत्नी आणि २ मुलांसह लक्ष्मी नगरात राहतात. राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. आंबेडकर वाड्यासमोर राजू सोनवणे यांची आई व पुतण्या राहत असल्याने ते त्यांना भेटायला येत होते. रविवारी रात्री देखील ते आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले. आज सकाळी राजू सोनवणे खाली न आल्याने त्यांनी एक मुलाला वर पाठविले असता त्याला घडलेला प्रकार लक्षात आला.
राजू सोनवणे यांचे डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे