जळगाव खुनाने हादरले : तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील खोटे नगर भागामधील एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज रात्री घडली असून घटना स्थळावरून आरोपी फरार झाल्याचे समजते खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ सदरील खून झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या याला मागील भांडणाच्या कारणावरून एकाने धारदार शस्त्राने भोसकल्याने तरुणांचा खून करण्यात आल्याची। घटना आज साडे दहा वाजेच्या सुमारास घटना घडली असून तालूका पोलिस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महेश पाटील याचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात ज्ञात मारेकर्यांनी विरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.बापू राजपूत हा एका गुन्हात नाशिक येथे शिक्षा भोगत होता .