सावखेड्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून ; मारेकरी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात रात्री पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.जळगाव जिल्ह्यात काही महिन्यापासून खून, गोळीबार, चोऱ्यांचे घटना वाढत असून पोलिस प्रशासनाने देखील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहे. परंतू रात्री जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात पून्हा तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार सावखेडा गावातील श्रावण लालचंद भिल ( सोनवणे) वय ४० यांचे पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशय भैय्या मदन पावरा याला होता. त्यामुळे श्रावण याचा काटा काढण्यासाठी तीन दिवसापूर्वी पत्नीला व सासूसोबत गावाला पाठवून दिले होते. बुधवारी रात्री श्रावण भिल व भैय्या हे दोघी दारू पिण्यास बसले आणि त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भैय्या पावरा याने श्रावण याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यात श्रावण यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयीत भैय्या पावरा हा पोलिस पाटील उत्तम दगडू चौधरी यांच्याकडे कामाला होता. त्यातच त्याने खून श्रावण याचा खून केल्यानंतर पोलिस पाटील यांच्याकडे येवून घटना सांगितली. पोलिस पाटील यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले.