जळगाव पुन्हा खुनाने हादरले : तरुणांची डोक्यात वार करत हत्या !
Jalgaon जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : शहरातील खुनाचे घटना थांबांयचे नाव घेत नसून हरिविठ्ठल नगर परिसरात पुन्हा एका तरूणाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून आठवड्यातील ही दुसरी घडला घडली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते.
आज शनिवारी २३ जुलै रोजी हरी विठ्ठल नगर मध्ये रात्री ९ वाजता पुन्हा एकदा आपसातील वादामुळे तरुणाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. दिनेश काशिनाथ भोई (वय २८, हरी विठ्ठल नगर) हा रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर बसलेला होता. त्यावेळी अचानक विठ्ठल नामक संशयित व्यक्तीने मागून येत दिनेशच्या डोक्यात रॉडने जोरदार वार केले. यात तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयित विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर याळ ताब्यात घेतले आहे. सदरील घटनेने हरी विठ्ठल नगर मध्ये तणावाचे वातावरण असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.