एकनाथ खडसें विरोधातील नाना पाटलांची याचिका न्यायालयाने फेटाळली : जिल्हा बँक निवडणूक
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा बँक निवडणुकीतील खडसेंचे प्रतिस्पर्धी असलेले मुक्ताईनगर येथील नाना पाटील यांची याचिका अखेर औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यामुळे आता जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा निश्चित झाली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत नाना पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांच्या विरोधात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे कर्ज दार असल्याचे सांगून त्यांचे नाम निर्देश पत्र रद्द केले होते, यावरून त्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्याय मागण्याची विनंती केली होती मात्र त्या ठिकाणी देखील त्यांचा उमेदवारी अर्जा सुनावणी वेळी अर्ज फेटाळून लावण्यात आला होता मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र अखेर न्यायालयाने देखील त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला आहे.
यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा निश्चित झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भैदास पाटील, संजय पवार, शिवसेनेचे चिमणराव पाटील व अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. मात्र नाना पाटील यांची याचिका उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. नाना पाटलांची याचिका फेटाळून लावल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे अखेर बिनविरोध निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.