भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जाळगाव जिल्ह्यात नवीन सुधारित निर्बंध लागू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे,वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्यात कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नविन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठया प्रमाणात होत असल्याने नमूद शासन आदेश दिनांक 8 व 9 जानेवारी, 2022 च्या सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.

दिनांक 1 मार्च, 2022 अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25 फेब्रुवारी, 2022 रोजी झालेल्या बैठकीत संपूर्ण राज्यात दिनांक 4 मार्च,2022 पासून सुधारीत निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.?
सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, घरपोच सुविधा पुरविणारे कर्मचारी यांनी कोविड – १९ प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधीत सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, मॉल्स, शिएटर, नाटयगृह, पर्यटन स्थळ, रेस्टॉरंट, क्रिडा स्पर्धा, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी येणारे सर्व अभ्यांगत, नागरिक यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील.

सर्व कार्यालये / आस्थापना, सार्वजनिक/ खाजगी ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी ज्यांचे सामान्य जनतेशी संपर्क येतो अशा सर्व कर्मचाऱ्यांना कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील. सर्व औद्योगिक कंपन्या / आस्थापना या ठिकाणी काम करणार सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, सामाजिक / क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सण-उत्सव संबंधित कार्यक्रम लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारेचे मोठया प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम, सभा हे केवळ जागेच्या 50% क्षमेतेच्या आत किंवा 200 लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील. सर्व शैक्षणिक संस्थेच्या ठिकणी ऑफलाईन क्लासेस हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार सुरु राहतील.

तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांनी शिक्षणाचा फायदा देण्यासाठी Hybrid model नुसार ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीचा वापर करावा. सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडी सुरु राहतील, वर नमूद सर्व शैक्षणिक संस्था / आस्थापना यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे ( Covid Appropriate Behaviour ) पालन करणे अनिवार्य राहील. सर्व घरपोच सुविधा पुरविणाऱ्या सेवा सुरु राहतील, सर्व शॉपींग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल्स, रेस्टॉरंट व बार, स्पोटर्स कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमींग पुल, धार्मिक स्थळे, नाटयगृह, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क इत्यादी ठिकाणे हे 50% क्षमतेसह सुरु राहतील.

कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची मात्रा घेतलेल्या नागरिकांना आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवास करण्यास मुभा राहील. तथापि ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. अशा नागरिकांना 72 तासाच्या आतील निगेटीव्ह RTPCR चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील, तसेच प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रवेश पासची आवश्यकत राहणार नाही, सर्व शासकीय, खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, सर्व औद्योगिक कंपन्या/ आस्थापना, वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, वर नमूद केलेल्या कार्यक्रम / उपक्रमांव्यतिरीक्त इतर सर्व उपक्रम हे 50% क्षमतेसह सुरु राहतील.
वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

तसेच शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये दिलेल्या निर्देषानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे

( Covid Appropriate Behaviour ) उल्लघन करण्याऱ्या व्यक्ती /संस्था / घटक यांचेवर पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक 26 ऑक्टोंबर, 2021 रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार Revenue Receipt, (c) Other non-Tax Revenue, (1) General Services, ००७०-Other Administrative Services ८०० Other Receipt या लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी.

सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!