जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी १० लाखाची लाच,तिघांवर गुन्हा दाखल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तब्बल १९ वर्षांपासून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अश तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील रहिवाशी आहे. अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील १९ वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सदर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता. सदर न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंरही सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील अनिल पाटील (वय ५२, कनिष्ठ लिपीक, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-३ रा.शिरपुर), निलेश अहीरे (वय ५२, समिती सदस्य, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-१ रा.नंदुरबार/नाशिक व राजेश ठाकुर (वय- ५२, कनिष्ठ लिपीक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,नाशिक वर्ग-३) या तिघांनी तक्रारदार यांच्याकडे १० लाखांची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार जळगाव पथकाने कॉल डिटेल आणि तांत्रिक यंत्रनेच्या माध्यमाच्या चौकाशीतून तिघांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर मॅडम, (पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), एन. एस. न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक)नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक ला प्र वि जळगांव, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, ला. प्र. वि. जळगांव, पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो. ह. रवी घुगे, पो. ह.अशोक अहिरे,पो.ना.बाळू मराठे, पो.ना. सुनील वानखेडे, पोना. ईश्वर धनगर,पो. कॉ. प्रणेश ठाकूर आदींच्या पथकानं ही कारवाई केली.पुढील तपास नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे अभिषेक पाटील करीत आहे.