प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून पुन्हा ११ चोरट्यांना अटक, चोरट्यांची संख्या झाली ३८
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे शिवमहापुराण कथा सुरू असून या शिवमहापुराण कथेतून पहिल्याच दिवशी पॉकेट व मंगलपोत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. आज पुन्हा एलसीबीच्या पथकाने टोळीसह ११ जणांना अटक केली आहे. टोळीतील सदस्य हे राजस्थान व मध्यप्रदेश येथील आहेत.चोरट्यांनी संख्या आता ३८ झाली आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ गेल्या तीन दिवसांपासून शिवमहापुराण कथा सुरु असून कथेला दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने कथेच्या पहिल्याच दिवशी संशयितरित्या फिरणाऱ्या तब्बल २७ महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत.
परंतु गुरुवार रोजी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील अकरा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली , गुरुवारी पुन्हा एलसीबीच्या पथकाने मिथीलेश बदनसिंगकुमार (वय २८), बिमलेश अनिलकुमार (वय ३५), प्रिया उर्फ ज्योती दीपक साहिल (वय ३०), ममताकुमारी सुभेदारसिंग (वय ३५), बिनाकुमारी जंदेलकुमार (वय ५०, सर्व रा. राजस्थान), किरण रमेश हरजन (वय २३, रा. ईलाहबाद, ता. उत्तरप्रदेश), विजेता राकेश जाटम (वय ३०), उषा सुरज जाटम (वय ४०), सविता बिनकुमार (वय २१), कोमल विजेंदर जाटम (वय २०), कमलेश राजेंद्र जाटम (वय ३५, सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश) या संशयितांना अटक केली.या ११ महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.या आता एकूण संशयितांची संख्या ही ३८ झाली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.