१३६० रुपयांची लाच मागितली, खाजगी इसम जळगाव एसीबी च्या जाळ्यात
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत,पीक कर्जाचा बोझा लावून देतो,असे सांगून रुपये १३६० रुपयांची लाच घेताना एका खाजगी इसमाला जळगाव लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले
तक्रारदार यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/- रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता सदर कार्यालयात उपस्थित भगवान दशरथ कुंभार या खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याच काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे, तक्रारदार व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ पासपोर्ट फोटो सांगितले.
तसेच आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात खाजगी इसमाने तक्रारदारास १,३६०/-रुपये लाचेची मागणी केली, सदर मागणी केलेली लाच रक्कम स्वीकारताना भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसम,रा. बांबरुड, ता. पाचोरा जि.जळगाव. याला बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी आज दि.१७ मे रोजी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा पथकात श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.श्रीमती.एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. PI.श्री.संजोग बच्छाव,लाप्रवि जळगाव
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. यांनी सहभाग घेतला.