२२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्यां मंडळींवर आरोप
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी पैशासाठी तिचा खून सासरच्या लोकांनी केला असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
शेंदुर्णी येथील माहेर असलेल्या प्राजक्ता अजय बारी (बुंधे) वय २२ हिचा शिरसोली येथील अजय अशोक बारी (बुंधे) वय ३० याच्यासोबत ११ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. अजय बारी हा तेलंगणा राज्यात मनचगुरु येथे अँब्युलस चालक म्हणून शासकीय नोकरी करतो. दोन दिवसांपुर्वी तो गावी शिरसोलीत आला होता. आज दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे रहात्या घरात वरच्या मजल्यावर प्राजक्ता बारी ही गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आली. तीने आत्महत्या केली की तीला गळफास दिला गेला यामुळे खळबळ उडाली आहे.
मात्र सासरचे लोक दोन लाख रुपये हुंडा मागत होते. काही दिवसांपूर्वी तीन तोळे सोने दिले होते. या छळातूनच प्राजक्ताची गळफास देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप शेदुर्णी येथिल प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.