भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यातील २५ कोविड केअर सेंटर बंद

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव(प्रतिनिधी)। शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे तब्बल २५ खासगी कोविड केअर सेंटरचालकांनी सेंटर बंद केले आहे. एकूण ११८ खासगी कोविड केअर सेंटर जिल्ह्यात सुरू होती. फेब्रुवारीत वाढलेली कोरोनाबाधितांची संख्याही आता निम्म्यावर आली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांपर्यंत पोचली होती. हा कोरोना महामारीतील रुग्णांचा उच्चांक होता. तो दिवसेंदिवस खाली आला आहे. कालपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार ५३९ वर येऊन ठेपली आहे, तर रोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही १९४ वर आली आहे. खासगी कोविड सेंटरमधील रुग्ण कमी झाल्याने खासगी डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड केअर सेंटर बंद करीत असल्याचे सांगून सेंटर बंदही केले आहे. जिल्हा कोविड रुणालयातील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील दोनशेच्या जवळपास बेड रिकामे आहेत.

एकूण आतापर्यंत कोरोनाबाधित–१ लाख ३९ हजार ३३१
आतापर्यंत एकूण बरे झालेले–१ लाख ३० हजार २७६
सध्या ॲक्टिव्ह रुग्ण–६ हजार ५३९
आतापर्यंत एकूण मृत्यू–२ हजार ५१६
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दुसरी लाट आता संपण्याच्या मार्गावर आहे. २५ खासगी कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहेत. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!