ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरात ड्रेसकोड लागू! ‘या’ मंदिरांचाही समावेश
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत आता जळगाव जिल्हाही पुढे सरसावला आहे.जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरात येत्या सात दिवसात ड्रेसकोड लागू होणार आहे त्यात यावल तालुक्यातील महर्षी व्यास मंदिर व सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह महत्वाच्या मंदिरांचा समावेश आहे.
राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत अनेक जिल्ह्यातील हिंदू मंदिर आपला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसताय. काल राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतल्याच्या बातमीनंतर आज जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये येत्या सात दिवसांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने अन्य मंदिरात देखील तीन महिन्यांमध्ये वस्त्रसंहिता लागू होईल असेही मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध पद्मालय मंदिर, पारोळ्यातील बालाजी मंदिर देवस्थान, भवानी माता मंदिर कुसुम्बा, तालुका रावेर, हनुमान मंदिर सूनसावखेडा, तालुका यावल. व यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह यावल येथील महर्षी व्यास मंदिरांचा यात समावेश आहे.