जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण सोहळ्यातच शेतकरी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात जामनेरच्या वंदना सुनील पाटील या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जामनेर येथील सुनील पाटील व त्याची पत्नी वंदना सुनील पाटील याचा काही धान्य व्यापाऱ्यांनी शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा आरोप असून त्यांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि त्यांचे पती गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण उपोषणाला बसले आहेत परंतु प्रशासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने महिलेने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच या महिलेन स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच धावपळ उडाली. परंतू पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.