भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लाखो रुपये दलाली घेऊन बोगस विवाह लावून तरुणांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने कित्येक मुले विवाहा वाचून मुकले आहेत,वय वाढत आहेत पण मुली मिळत नाही, इतकेच काय विवाह योग्य वयातील तरुणांना सुद्धा मुली मिळत नसल्याने आता जात – पात न पाहता कुठल्याही जातीच्या मुलींशी लग्न करायला मुले तयार असतात, हा विषय कुठल्याही एका समाजाचा नाही जवळ जवळ बऱ्याच समाज्याच्या लोकांना भेळसावणारा प्रश्न आहे. लांब लांब च्या मुलींशी लग्न करतात.या मुळे दलालांची मोठी चांदी होते, मध्यस्थी दलाल लाखो रुपये घेऊन लांबच्या मुलींशी लग्न लाऊन देतात. लग्न झाल्यावर काही दिवस नवरी मुलगी सासरी राहते आणि कोणत्याही कारणाने माहेरी जाते म्हणून निघून जाते,इतकेच नव्हे तर न सांगता पैसा अडका, सोने चांदीचे दागिने घेऊन पळून जातात,अशा प्रकारे तरुणांची फसवणूक केली जाते.असे अनेक प्रकार घडतात परंतु फसवणूक झालेले तक्रारदार समोर येत नाही.असाच एक प्रकार जळगाव तालुक्यात घडला. जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील तरुणाला विवाह संबंधातून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून दलालासह नवरी व ५ साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला आहे.


जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील एका ५९ वर्षीय प्रौढाने दि. १ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दिली आहे. ते गावात त्यांच्या परिवारासह राहतात. चोपडा तालुक्यात चौगाव येथील कैलास पाटील या दलालाच्या मध्यस्थीतून तक्रारदाराच्या मुलासाठी मध्यप्रदेशातील एका तरुणीचे स्थळ आले. दोघांचा विवाह पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथे तुळजा भवानी मंदिर येथे १२ नोव्हेंबर रोजी विवाह लावला. यानंतर वेळोवेळी रोख रक्कम व दागिने मिळून २ ते अडीच लाख रुपये तक्रारदाराच्या मुलाने नवरी व तिच्या नातेवाईकांना दिले आहे.

सदरहू नवरी हि विवाह झाल्यावर अडीच महिने नांदली आहे. नांदताना नवरीने घरातील सर्व कामे केली. आपुलकीने वागली. त्यानंतर ७ जानेवारी रोजी भावाच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम असल्याचे सांगून दोघेही तक्रारदारासह पती पत्नी हे चोपडा येथे गेले. त्यानंतर संशयित रामसिंग पावरा हा दुचाकी घेऊन आला. मी पुतणीला घेऊन पुढे जातो, तुम्ही दोघे दुसऱ्या दुचाकीने या म्हणत ते निघून गेले. नंतर तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना सेंधवा तालुक्यातून नवरी व तिचा बनावट काका यांनी दोघांना गुंगारा देऊन पळ काढला आहे.

त्यानंतर याबाबत संपर्क करण्यासाठी संबंधित संशयित यांना फोन केले असता फोन बंद होता . त्यामुळे मुली न मिळण्याच्या लाचारीपोटी दलाली घेऊन लाखो रुपये घेऊन बोगस विवाह लावून तरुणांची फसवणूक करणारी टोळी असल्याबाबत तक्रारदार प्रौढांने तक्रार अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी कैलास पाटील (रा. चौगाव ता. चोपडा) या दलालासह नवरी निर्मला पावरा, सुभराम पावरा, दिलीप पावरा, रामसिंग पावरा, कालू पावरा व आणखी एक (सर्व रा. मध्यप्रदेश) यांच्याविरोधात तक्रार अर्ज दि. १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे. मात्र अद्यापही याबाबत कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच पोलिसांनी पुढील काहीही कारवाई संशयित आरोपींवर केलेली नाही. त्यामुळे याबाबत आता वरिष्ठांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे तक्रारदारांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!