जंतर मंतर मैदानावर स्वस्त धान्य दुकानदाराचे एक दिवसीय राष्ट्रीय धरणे आंदोलन
जाळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद मोदींच्याच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय राष्ट्रीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथील जंतर मंतर मैदान येथे स्वस्त धान्य दुकानदार राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हादजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धरणे कार्यक्रम संपन्न झाला.संपुर्ण भारत देशाच्या विविध राज्यांतून पदाधिकारी आणि दुकानदार लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते.या मध्ये जळगाव जिल्ह्यातून तुकाराम निकम जिल्हाध्यक्ष प्रा. संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर मुक्ताईनगर जामनेर तालुक्यातुन 300 स्वस्त धान्य दुकानदार व पदाधिकारी उपस्थित होते.
त्या प्रसंगी सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रा.संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व गुणवंत पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेश जी अबुसकर यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद जी मोदी यांच्या राष्ट्रीय धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला असुन त्याच प्रमाणे सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
त्या मध्ये पुढील प्रमुख मागण्या होत्या . राज्यांतील सर्व स्वस्त धान्य दुकानदाराना कोरोना योध्दा घोषित करून कोरोना काळा मध्ये मृत झालेल्या वारसांना 50 लाख रुपये मदत मिळावी .राज्यातील सर्व दुकानदारांना कमीशन वाढऊन देणे. राज्यांतील सर्व दुकानदारांना शासकीय दर्जा मिळावा त्याचं प्रमाणे इतर मागण्या पुर्ण होण्या बाबत राष्ट्रपती व नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री यांना निवेदन देण्यात आले .त्या प्रसंगी प्रा संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुणवंत पाटील, ता.अध्यक्ष विठ्ठल पाटील दिनेश महाजन लखन महाजन, आत्माराम कोळी ,दिलीप साबळे ,निलेश महाजन ,किशोर कृष्णा सावळे पाटील देवानंद गजरे आर. आर. शेख, हितेश भालेराव,राजेंद्र गुरव,भिमराव इंगळे, गोपाळ पाटील, गणेश पाटील दीपक पाटील दीपक महाजन सुलभा मुसळे ,प्रियंका पाटील, कविता सोनवणे व संख्य दुकानदार उपस्थित होते.