अल्पवयीन मुलीचे अपहरण
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शहरातील फुले मार्केट परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत असून गुरूवार १८ ऑगस्ट रोजी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात आले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचे प्रकार उघडकीला आला. तिच्या नातेवाईकांनी संपूर्ण फुले मार्केट परिसर पिंजून काढला.
मात्र सदर मुलगी कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भदाने करीत आहे.